Special Report | पुणे महापालिकेवरची सत्ता राष्ट्रवादी पुन्हा मिळवणार?

पुणे महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा मैदानात उतरले आहेत. फडणवीसांनी पुण्यात जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्याही पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे, पण पुण्यात पुन्हा फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मोहिमेत आमदार गोपीचंद पडळकरही उतरले आहेत.

पुणे : पुणे महापालिका पुन्हा काबीज करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा मैदानात उतरले आहेत. फडणवीसांनी पुण्यात जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्याही पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता आहे, पण पुण्यात पुन्हा फडणवीस, आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मोहिमेत आमदार गोपीचंद पडळकरही उतरले आहेत. तसेच पुणेकरांचं पाणी पळवणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवू, असा नाराही यावेळी फडणवीसांंनी दिलीय. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे मनसेनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली तर पुण्यात शिवसेनेचा महापौर बरणार असं संजय राऊत सांगताहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI