Pune | प्रवीण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलं.

पुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रवीण दरेकरांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. दरेकर माफी मागा, नाहीतर महिलांचा अपमान करणाऱ्यांचं आम्ही थोबाड आणि गाल रंगवू, असा इशारा चाकणकरांनी दिलाय. त्यानंतर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून पुण्यात आणि उस्मानाबादेत आंदोलन करण्यात आलं. पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं प्रवीण दरेकरांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी प्रवीण दरेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आलं. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दरेकर यांच्यावर जोरदार टीका केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI