दौंड गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत?
दौंड जिल्ह्यातील गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत आला आहे. भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावानेचा या गोळीबारात सहभाग असल्याचं आता समोर आलं आहे.
योगेश बोरसे, प्रतिनिधी
पुण्यातील दौंड जिल्ह्यातील गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादीचा आमदार अडचणीत आला आहे. भोर वेल्ह्याचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावानेचा या गोळीबारात सहभाग असल्याचं आता समोर आलं आहे. बाळासाहेब मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधु आहेत. बाळासाहेब मांडेकर यांच्यासह इतर तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदाराचे भाऊ असल्याने हे प्रकरण दाबण्यात येत आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
पुणे जिल्ह्यातील दौड येथील एका कलाकेंद्रात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेला वाचा फोडली आहे. या घटनेत एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा अंदाधुंद गोळीबार करणारा आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ आहे. त्यामुळे पण ते हे प्रकरणच दाबण्याचा प्रयत्न करत आहेत,असंही आरोप पवारांनी केला आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

