Video : नवनीत राणांना राजकरणाचा सिनेमा करायचाय, निलम गोऱ्हेंचं टीकास्त्र
नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात आणि सध्या त्या तेच करत आहेत. आपण काय आहोत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. हे असले सगळे फडतूस लोक आहेत, त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे असे दिसत आहे, असा संताप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यात आज शिवसेनेचा […]
नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात आणि सध्या त्या तेच करत आहेत. आपण काय आहोत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. हे असले सगळे फडतूस लोक आहेत, त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे असे दिसत आहे, असा संताप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यात आज शिवसेनेचा (Shivsena) संपर्क मेळावा आहे. त्यासाठी त्या पुण्यात आहेत. यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच सभागृहात शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा समाचार घेतला. मुंबई महापालिका, राज ठाकरे, भाजपा आदी विषयांवरही त्यांनी मत व्यक्त केले. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

