AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर, पोरांनो पटापट तारीख चेक करा अन् लागा तयारीला

मोठी बातमी! आता ‘नीट’ परीक्षा होणार… नवी तारीख जाहीर, पोरांनो पटापट तारीख चेक करा अन् लागा तयारीला

| Updated on: May 15, 2026 | 10:28 AM
Share

देशभरात 3 मे 2026 रोजी पार पडलेल्या NEET 2026 परीक्षेनंतर पेपरफुटी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आल्यानंतर प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परीक्षा प्रणाली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आणि अखेर 3 मे रोजी झालेली NEET परीक्षा रद्द करण्यात आली.

या प्रकरणात राजस्थान, हरियाणा, नाशिक, अहिल्यानगर आणि लातूर येथील काही संशयितांना अटक करण्यात आली असून, पेपरफुटीचे देशव्यापी जाळे उघड होत असल्याची माहिती समोर येत आहे. काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. नाशिकहून राजस्थानपर्यंत आणि तेथून हरियाणापर्यंत पेपर पोहोचल्याचे तपासातून स्पष्ट होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राष्ट्रीय परीक्षा आयोगाने NEET 2026 परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली असून, आता ही परीक्षा 21 जून 2026 रोजी देशभरात पुन्हा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला असून, नव्या परीक्षेत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत पेपरफुटी प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला उच्च शिक्षण सचिव सचिन विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. CBI कडून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: May 15, 2026 10:28 AM
Follow Us