नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात त्रिशुली येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँकेची शाखा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. या घटनेनंतर बचाव पथकाने तातडीने कार्यवाही करत बँकेतील मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी आणि बचाव पथकाने संयुक्तपणे आठ तास अथक प्रयत्न करून बँकेतून सोने आणि रोख रक्कम बाहेर काढण्यात यश मिळवले. या मोहिमेमध्ये ५० कोटी नेपाळी रुपये किमतीचे […]
नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात त्रिशुली येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट बँकेची शाखा पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. या घटनेनंतर बचाव पथकाने तातडीने कार्यवाही करत बँकेतील मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली. पोलिसांनी आणि बचाव पथकाने संयुक्तपणे आठ तास अथक प्रयत्न करून बँकेतून सोने आणि रोख रक्कम बाहेर काढण्यात यश मिळवले.
या मोहिमेमध्ये ५० कोटी नेपाळी रुपये किमतीचे सोने आणि दीड कोटी नेपाळी रुपयांची रोख रक्कम सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. पोलिसांनी बँकेतून चांदी आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत.
बँकेतील सोने सुरक्षित पेटीत असल्यामुळे ते जसेच्या तसे हाती लागले, त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, पुराच्या पाण्यामुळे पैशांच्या नोटा चिखलाने माखलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या बचाव कार्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान टळले असून, स्थानिक प्रशासनाने बचाव पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
