HSRP Update Video : तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट लावली का? अजून नसेल लावली तर नो टेन्शन, कारण…
तुम्ही कोणतं वाहन चालवता किंवा तुमच्या मालकीचं कोणतं वाहन आहे का? तसं असेल तर लक्ष देऊन पाहा आणि कान उघडे ठेवून ऐका. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली.
परिवहन विभागाकडून प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. HSRP नंबरप्लेटसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. HSRP ( हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) नंबरप्लेट बसवण्यासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. ३० जूनपर्यंत HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी आपल्या वाहनांना ३१ मार्चपर्यंत HSRP नंबरप्लेट लावणं बंधनकारक होतं. मात्र त्यात आता वाढ करून ३० जूनपर्यंत HSRP नंबरप्लेट बसवण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी कशी?
एचएसआरपी ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून तयार केली जाते.
होलोग्राम स्टिकर सह ही नंबर प्लेट येते.
वाहनाचा इंजिन आणि चेसीसचा नंबर त्यावर लिहिलेला जातो.
नंबर युनिक असून तो प्रेशर मशीनने लिहिलेला जातो.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

