Mansukh Hiren Case | मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आरोपींना 45 लाख दिल्याचा NIA चा दावा

अँटिलिया स्फोटक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली.

अँटिलिया स्फोटक प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएतर्फे मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती देण्यात आली. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मागणी तपास यंत्रणेने केली. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपींनी हत्येसाठी 45 लाखांची सुपारी दिली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन महत्त्वाचा साक्षीदार असल्यामुळे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचं एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं. 4 ते 5 साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI