tv9 Marathi Special Report | एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची टांगती तलवार?
नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या घरात लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप आहे, ते घर अनधिकृत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. या घराचा संबंध एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्याशी असल्याने आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. महापालिकेने संबंधित घरावर नोटीस बजावत ते बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले आहे.

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, मतीन पटेल यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये याच घराचा राहत्या पत्त्यासाठी उल्लेख केला होता. त्यामुळे जर हे घर अनधिकृत ठरले, तर त्यांच्या नगरसेवक पदावरही गंडांतर येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, निदा खानला लपवून ठेवल्याचा आरोप असलेल्या या घरावर महापालिकेकडून बुलडोझर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने दिलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदतही संपली आहे.
मात्र, या नोटीसविरोधात मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली असून, महापालिकेची नोटीसच बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील पुढील कारवाई न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे.
Published on: May 12, 2026 09:46 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्