Nitesh Rane : उगाच डरकाळी मारु नका, नितेश राणेंनी पुन्हा आदित्य ठाकरेंना डिवचले

निलेश राणे यांनी तर विधीमंडळाच्या पायरीवरील आठवण करु दिली, त्यावेळी म्याव..म्याव चा आवाज काढल्यानंतर सबंध राज्यात त्यांची गोची झाली होती. त्यामुळे आता त्यांनी उगाच डरकाळी माऱ नये असेच राणे यांनी सुनावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. आता दहीहंडीच्या दिवशीही राजकारण पाहवयास मिळाले.

राजेंद्र खराडे

|

Aug 19, 2022 | 7:08 PM

मुंबई : राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत असला तरी या कार्यक्रमातही राजकारण पाहवयास मिळाले आहे. अनेकांनी या दिवशी तरी राजकारण नको असे म्हणत आपले राजकीय शेरेबाजी ही सुरुच ठेवली होती. लक्षवेधी ठरली ती वरळी येथील दहीहंडी. आता वरळी ही सर्वांनाच आवडत असल्याची मिश्किल टिपण्णी आ. आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्याला विरोधकांकडून उत्तर दिले जात आहे. यावेळे निलेश राणे यांनी तर विधीमंडळाच्या पायरीवरील आठवण करु दिली, त्यावेळी म्याव..म्याव चा आवाज काढल्यानंतर सबंध राज्यात त्यांची गोची झाली होती. त्यामुळे आता त्यांनी उगाच डरकाळी माऱ नये असेच राणे यांनी सुनावले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत. आता दहीहंडीच्या दिवशीही राजकारण पाहवयास मिळाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें