Special Report | भाजप आमदार Nitesh Rane यांना कोल्हापूरला हलवंल -tv9

आज नितेश राणेंना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केलं. गेलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्ताना राणेंना घेऊन पोलिसांचा ताफा सिंधुदुर्गातून गगनबावड्यात पोहोचला. आणि गगनबावडा घाटातून पुढे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Feb 07, 2022 | 9:31 PM

कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे सध्या अटकेत आहेत. न्यायालयाने त्यांना कोठडीत पाठवलं आहे. मात्र आज नितेश राणेंना प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केलं. गेलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्ताना राणेंना घेऊन पोलिसांचा ताफा सिंधुदुर्गातून गगनबावड्यात पोहोचला. आणि गगनबावडा घाटातून पुढे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल झाला. यावेळी कोल्हापुरातील रुग्णालय परिसरातही तगडा पोलीस बंदोबस्ता लावण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. आणि याच प्रकरणात न्यायालयाने चारवेळा जामीन फेटाळल्याने नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नितेश राणे यांना कोल्हापुरात दाखल केल्याने कोल्हापूर पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें