Nitin Gadkari | वडेट्टीवारांनी बेजबाबदार, खोडसाळ राजकारण करू नये : नितीन गडकरी

देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देखील विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेडमध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात बोलताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. देवेंद्र फडवणीस आणि नितीन गडकरी यांच्यात 36 चा आकडा असल्याचा दावा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नांदेडमध्ये प्रचारसभेत बोलत असताना वडेट्टीवार बोलत होते. फडवणीसची जिरवायची होती बर झालं जिरली अस आपल्याला गडकरींनी सांगितल्याचा दावा मंत्री वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देखील विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला नितीन गडकरींनी लगावला आहे. विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही, असं गडकरींच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI