मालवण पुतळा दुर्घटनेवरुन नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, सत्तेतील ‘त्या’ तिघांचे दावे खोडले?

मालवण पुतळा दुर्घटनेवरुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. मुंबईतील एका बांधकामाचे उदाहरण देत स्टेनलेस स्टिलचा वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता असं नितीन गडकरी म्हणाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

मालवण पुतळा दुर्घटनेवरुन नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, सत्तेतील 'त्या' तिघांचे दावे खोडले?
| Updated on: Sep 05, 2024 | 11:33 AM

पुतळा दुर्घटनाप्रकरणी नितीन गडकरींनी सरकारला घरचा आहेर देताना म्हटलं की, वादळी वाऱ्याने पुतळा पडला, खारं वाऱ्यानं गंज लागून पुतळा पडला किंवा निकृष्ट दर्जांचं काम सरकारकडून झाल्याची तक्रार अशा तीन सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना अप्रत्यक्षपणे नितीन गडकरींनीच खोडून काढलं आहे. तर दुसरीकडे शिल्पकार जयदीप अपटे अद्याप फरार असून सापडत नसल्याने पोलिसांच्या कारभारावर विरोधकांनी शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस, अनेक शोध पथकं मागावरून असून जयदीप आपटेचा शोध का लागला नाही, यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला जातोय. २६ ऑगस्ट रोजी शिवरायांचा मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला. त्याच रात्री शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर गुन्हा दाखल झाला. तर २७ ऑगस्टला त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि तो फरार झाला. तेव्हापासून पाच पोलीस त्याच्या घराबाहेर पाहरा देताय. याशिवाय ७ पथकं त्यांच्या शोधात आहे. कल्याण क्राईम ब्रांच पोलीस पथक, बाजारपेठ पोलीस स्टेशन, सिंधुदुर्ग क्राईम ब्रांच पोलीस पथक आणि मोबाईल ट्रेस करणारी दोन पथकासह अलिबाग स्थानिक शाखेचं पथक आपटेच्या शोधात आहेत.

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.