Nitin Raut | आम्ही पहाटे नाही, दिवसाढवळ्या शपथविधी घेतला, अंधारातील कामं करत नाही : नितीन राऊत

गुप्त बैठकीचे अनेक सूर असतात, हे सरकार पहाटेच्या अंधारात झालेलं नाही, उघडपणे शपथविधी घेणारं हे सरकार आहे. तिन्ही पक्ष सोबत काम करतील, सरकार पडणार नाही, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केला. ते औरंगाबादेत बोलत होते. 

संजय राऊत आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केल्यावरुन नितीन राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावेळी नितीन राऊत म्हणाले, “हे सरकर पहाटेचं नाही, तर उघडपणे शफथ घेऊन स्थापन झालं असून ते भक्कमपणे उभं आहे. आम्ही पूर्ण काम करणार, जोरात करणार. आम्ही एक आहोत म्हणून चांगलं काम होतंय”