मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल

मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे. (Congress Minister Nitin Raut on Reservation in Promotion)

  • Updated On - 11:52 am, Fri, 11 June 21 Edited By: नम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास विरोध नाही, पण आम्ही भिकारी आहोत का? नितीन राऊतांचा सवाल
nitin raut

अहमदनगर : “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?” असा सवाल उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे. मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे. (Congress Minister Nitin Raut on Reservation in Promotion)

नितीन राऊत मराठवाडा दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे, एनटी यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मते काय आहे हे जाणून घेणार आहेत.

त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये

आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे, तेच आम्ही मागतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये, अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे.

नितीन राऊत आक्रमक

आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही. तसेच आम्ही भिकारी नाही, असेही नितीन राऊत म्हणाले. मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती अरक्षणावरून नितीन राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणावरुन घमासान 

राज्य सरकारने 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाची जी उपसमिती तयार करण्यात आली त्या समिती विश्वासात घेण्यात आले नव्हते. त्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा 7 मे रोजी काढलेला जीआर रद्द होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कायदेशीरबाबींचा अभ्यास करून या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.  (Congress Minister Nitin Raut on Reservation in Promotion)

संबंधित बातम्या : 

“काँग्रेसची अस्तित्वासाठी झुंज, आता राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

‘भाजप भौ-भौ करत राहतो’, पेडणेकरांचा टोला; ‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो’, भातखळकरांचं प्रत्युत्तर

पीक विम्याचा बीड पॅटर्न शेतकऱ्यांची फसवणूक करणारा, माजी कृषीमंत्र्यांचा आरोप, केंद्राला माहिती देणार