Chitra Wagh | गजानन काळेंवर गुन्हा दाखल मात्र पोलिसांकडून कारवाई नाही

व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. "त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?" असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

Chitra Wagh | गजानन काळेंवर गुन्हा दाखल मात्र पोलिसांकडून कारवाई नाही
| Updated on: Aug 15, 2021 | 12:00 AM

मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (Gajanan Kale MNS) यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjeevani Kale) यांनी पतीविरोधात गंभीर आरोपांची माळ लावली आहे. मानसिक आणि शारीरिक छळासह, पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संजीवनी यांनी केला आहे. त्यानंतर खुद्द संजीवनी काळेंनी पाठवलेला एक व्हिडीओ भाजप उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे.

संजीवनी काळे व्हिडीओमध्ये काय म्हणतात?

“नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

“मला म्हणाले, तुला जे हवं ते मी करतो. त्याला घेऊन येतो मी पोलीस स्टेशनमध्ये, अशा पद्धतीने सेटलमेंटची भाषा माझ्यासोबत करण्यात आली आहे, तर चित्राताई मला न्याय हवा आहे, मला भीक नको आहे, मला न्याय हवा आहे, तो पण माझ्या मुलासाठी” अशी मागणी संजीवनी काळे या व्हिडीओच्या अखेरीस करताना दिसतात.

चित्रा वाघ यांची मागणी काय?

“हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या” अशी मागणी चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ शेअर करत केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीस यांना ट्विटरवर टॅग करत चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाहा चित्रा वाघ यांनी शेअर केलेला संजीवनी काळे यांचा व्हिडीओ

गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल 

मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीनेच तक्रार दाखल केली आहे. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे (Sanjivani Kale) यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरुळ पोलिस स्थानकात (Nerul Police Station) तक्रार दाखल केली आहे.

मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या आणि अशा आदी कलमांखाली काळे यांच्या पत्नीकडून नेरुळ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचंही त्यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यांचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

संबंधित बातम्या :

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

Navi Mumbai | मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून मारहाण, छळवणुकीचा गुन्हा दाखल

आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली

Follow us
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.