Kalyan Local Train | कल्याण रेल्वे स्थानकात पासची तपासणी नाही, तपासणीच होत नसल्याने घुसखोरी
प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी कल्याण रेल्वे स्थानकात केली जात नसल्याचं समोर आलंय. जो प्रवासी येईल तो बिनधास्तपणे रेल्वे स्थानकात घुसत आहे. त्यामुळे अधिकृत प्रवाशांसोबत अनधिकृत प्रवाशांचीही घुसखोरी सर्रासपणे रेल्वे स्थानकात होत असल्याचं पाहायला मिळतंय.
मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने चाकरमानी दररोज मुंबईला प्रवास करतात. ज्या प्रवाशांना कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले असतील, त्यांनाच रेल्वेकडून पास देण्यात आला आहे. मात्र, आज सकाळची कल्याण रेल्वे स्थानकातली परिस्थिती पाहिल्यानंतर कोरोनाचं सर्टिफिकेट दाखवून सही शिक्का घेण्यासाठी लागलेल्या रांगा, त्यानंतर पाससाठी लागलेल्या रांगा, हे सगळं करून काय उपयोग झाला? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण इतकं सगळं करूनही रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची कुठल्याही प्रकारची तपासणी कल्याण रेल्वे स्थानकात केली जात नसल्याचं समोर आलंय. जो प्रवासी येईल तो बिनधास्तपणे रेल्वे स्थानकात घुसत आहे. त्यामुळे अधिकृत प्रवाशांसोबत अनधिकृत प्रवाशांचीही घुसखोरी सर्रासपणे रेल्वे स्थानकात होत असल्याचं पाहायला मिळतंय.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

