मुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शासकीय विमान वापरता येणार, काय आहे सुधारीत नियम?
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही वापता येणार शासकीय विमान आणि हेलिकॉप्टर वापरता येणार? काय आहेत सुधारीत नियम?
मुंबई, १५ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शासकीय विमान आणि हेलिकॉप्टर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाने सुधारीत नवे नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागत होती. मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी राज्यपाल भगतसिंह यांच्यात शासकीय विमान वापरण्यावरून वाद-विवाद झाला होता. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेनेचे युती आल्यानंतर शासकीय विमान वापरासंबंधीचे १९६७ नियम कालबाह्य ठरवून १३ फेब्रुवारी २०१५ रोजी नियम लागू करण्यात आले. या नियमात राज्य शासनाच्या विमान वापरण्यात मुख्यमंत्र्यांना परवानगी देण्यात आली होती तर राज्यपालांना त्याबाबत मुख्यमंत्र्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानियमात बदल करण्यात आले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

