अभी नही तो कभी नहीं… ठाकरे बंधूंच्या गर्जनेला शेलारांनी फटकारलं, फेक नरेटिव्ह म्हणत केला हल्लाबोल
मराठी माणसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हा आमच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं देखील ठाकरे म्हणाले. हाच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न 2014 साली केला होता, तेव्हा मतदारांनी त्यांना झिडकारलं आणि त्यानंतर याच पध्दतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर पुन्हा 2017 ची निवडणूक उध्दव ठाकरे लढले मतदारांनी त्यांना ही नाकारलं
संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळाले. मराठी माणसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, मराठी माणसासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे. हा आमच्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे असं देखील ठाकरे म्हणाले. आगामी निवडणूक आणि हा महाराष्ट्र अशा वळणावर येऊन उभा आहे की ज्याला ‘अभी नही तो कभी नही’ असा फिल्मी डायलॉग म्हणत मुंबईसह ठाण्याची परिस्थिती ठाकरे बंधूंनी सांगितली. या गोष्टींसाठी आम्ही एकत्र येणं गरजेच आहे असं राज ठाकरे म्हणाले.
यावर भाष्य करत भाजप नेते आशिष शेलार चांगलेच बरसले, हाच फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न 2014 साली केला होता, तेव्हा मतदारांनी त्यांना झिडकारलं आणि त्यानंतर याच पध्दतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर पुन्हा 2017 ची निवडणूक उध्दव ठाकरे लढले मतदारांनी त्यांना ही नाकारलं आणि आजही तोच प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधू करत आहेत. ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अंहकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत जणू काही आम्ही म्हणजे मराठी आणि मुंबईकर या भावनेने ते बोलतात, असं देखील शेलारांनी म्हणत ठाकरे बंधूंना डिवचलं.

