Laxman Hake : अजितदादांना आचार-विचार नाही, दम असेल तर मला… लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज काय?
तुझा नेता दारूच्या कारखान्याचा मालक आहे. मग तुझा ब्रँड सांगायचा का? असा सवाल हाके यांनी केला. अजितदादा जनतेला वेड्यात काढू नका आणि तुमच्या पिल्लावळीला आवरा आज मी बारामतीत येतोय पाठवा तिकडे आडवायला, असं हाके म्हणाले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थखात्यावरून जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांना आचार-विचार नाहीत, जिथे सत्ता येईल तिथे जातात, असं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला अडवून दाखवा. आज संध्याकाळी बारामतीमध्ये येतोय, अडवून दाखवा, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हानच दिल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके पंढरपूर येथे असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हाके हे देशी दारुचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत, असे म्हणत जिव्हारी लागणारी टीका केली होती. यानंतर हाकेंनी प्रत्युत्तर देत सुरज चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय. मला अडवून दाखवावं, असं चॅलेंज दिलंय.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

