फडणवीसांवर आक्षेपार्ह विधानं अन् ‘त्या’ व्हिडीओत जातीवाचक टीका, अजितदादांच्या व्यक्तीकडूनच वादग्रस्त वक्तव्य?
एका व्यक्तीने फडणवीसांविरोधात जातीवाचक शब्द वापरून आक्षेपार्ह विधानं केलीत. तोच व्हिडीओ शेअर केल्यानं शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक झाली. मात्र आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या व्यक्ती अजित पवार गटातील सरपंच असल्याचा उल्लेख...
मुंबई, १ मार्च २०२४ : मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा वाद पेटल्यानंतर आता एका व्यक्तीने फडणवीसांविरोधात जातीवाचक शब्द वापरून आक्षेपार्ह विधानं केलीत. तोच व्हिडीओ शेअर केल्यानं शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला अटक झाली. मात्र आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या व्यक्ती अजित पवार गटातील सरपंच असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय तर दुसरीकडे भाजपच्या प्रविण दरेकर यांनी फोनवरून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये महिलांची डोकी फुटली. तेव्हा गप्प बसणारे आमदार फडणवीस यांना शिवीगाळ केली म्हणून आता का बोलायला लागलेत. यावरून एका व्यक्तीने दरेकर यांना केलेला फोन व्हायरल झाला. नंतर त्यावरच बाचाबाची झाल्याने संभाजीनगरमध्ये रमेश पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलंय. बघा नेमकं काय झालं फोनवर बोलणं?
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

