Video : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी 18 लाख कर्मचारी संपावर
Old Pension Scheme : शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कृषी, सहकार, कारागृह, आरोग्य, साखर संकुल, जिल्हा परिषद, महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय, नोंदणी विभाग, भूमी अभिलेख, पालिका, शिक्षक शिक्षकेतर, नगरपालिका, आरटीओ , आशा वर्कर्स यासह सुमारे 32 विभागातील कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर आंदोलनं केली जाणार आहेत. राज्य सरकारी, निम सरकारी,जिल्हा परिषद, महसूल, महानगरपालिकेतील कर्मचारी आज संपावर आहेत. 32 विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 18 लाख कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. पुणे जिल्ह्यातील 68 हजार अधिकारी-कर्मचारी संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. बालवाडी, अंगणवाडी, आशा वर्कर्स, बदली कर्मचारी यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावं. रिक्त जागा 100 टक्के भरा. लिपिक संवर्गासह समान कामाला समान दाम द्या. निवृत्तीचे वय 60 वर्षे करा. महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे लाभ आणि सवलती द्याव्यात, अशा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

