मोठी खळबळ! अरे असा पराभव…. ओमराजेंची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् थेट शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याभर खळबळ उडाली. दरम्यान, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह एकूण सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली अन् थेट शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याभर खळबळ उडाली. दरम्यान, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात दौरा केला. ही बाब अजून ताजी असतानाच त्यांच्या वरळीतील आणखी एका नेत्याने ठाकरेंना धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.
अशात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांना एक कार्यकर्ता काहीतरी विचारत असून ओमराजे निंबाळकर त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या निर्णयाबाबत सांगत आहेत.
कार्यकर्त्याला ओमराजेंनी सांगितलं, ‘मला लाईनमन म्हणू नका… मला हिणवू नका… विरोधक असताना तशीच परिस्थिती होती म्हणूनच…’ तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, ‘विरोधात राहून इतकी वर्षे काम केलं, मग आता का?’ तेव्हा ओमराजे म्हणतात, ‘विरोधात राहिलो इतकी वर्षे, मात्र असा पराभव जो झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, इतका वाईट पराभव नव्हता झाला कधी….’ ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्ता आणि ओमराजेंचा संवाद होत असल्याचं सांगितलं जात आहे. (सदर ऑडिओ क्लिपची टीव्ही९ मराठी पुष्टी करत नाही)
Published on: Jul 01, 2026 09:55 AM
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video

