Ashadhi Ekadashi 2021 | औरंगाबादेत आसावरी लिंगाडे हिने रांगोळीतून साकारला विठुराया

आषाढी एकादशीनिमित्त अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. औरंगाबादेतील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र विठुच्या नामाचा गजर होत आहे. अवघा महाराष्ट्र विठुमाऊलीच्या रंगात रंगला आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे पंढरपुरात गर्दी न करण्याचे आदेश असल्याने अत्यंत पारंपरिक पद्धतीने आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. सर्व विठ्ठलाचे भक्त घरुनच माऊलीचा आशीर्वाद घेत आहेत. औरंगाबादेतील आसावरी लिंगाडे यांनीतर थेट रांगोळीतून विठुरायाला साकारले आहे.