WITT Global Summit : ‘मोदी गॅरंटी’ आणि ‘अच्छे दिन’वरून काँग्रेसचा हल्लाबोल
आगामी निवडणुकीत इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा दावा काँग्रेस नेत्यानं करत भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केला. भाजपच्या 400 प्लसच्या घोषणेवर प्रमोद तिवारी यांनी खोचक भाष्य करत असे म्हटले की, 400 जागा कुठून मिळणार? त्यापैकी 100 ही येणार नाहीत. यावर भाजपचे गौरव भाटिया यांचं प्रत्युत्तर
नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी, २०२४ : TV9 च्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ तीन दिवसीय या ग्लोबल समिटच्या शेवटच्या दिवशी सत्ता संमेलन हे सेगमेंट चांगलंच गाजत आहे. ‘2024 मध्ये सत्ता कोणाची?’ असा पहिल्या सत्राचा विषय असून ज्यामध्ये देशातील दोन मोठ्या पक्षांच्या नेत्यांमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली. यावेळी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी म्हणाले की, गॅरंटी 15 लाखांची होती, गॅरंटी अच्छे दिनचीपण होती. पण भाजपची गॅरंटी चालत नाही. मोदी हे 73 चे आहेत आणि डॉलर 83 वर पोहोचला आहे. आगामी निवडणुकीत इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल, असा दावा काँग्रेस नेत्यानं करत भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केला. भाजपच्या 400 प्लसच्या घोषणेवर प्रमोद तिवारी यांनी खोचक भाष्य करत असे म्हटले की, 400 जागा कुठून मिळणार? त्यापैकी 100 ही येणार नाहीत. यावर भाजपचे गौरव भाटिया म्हणाले, भाजपकडे मोदींसारखा नेता आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जेपी नड्डा यांच्यासारखे अध्यक्ष, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि राजनाथ सिंह आहेत. आपल्याकडे अनेक बडे नेते आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे,...
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

