तुम्ही Online पेमेंट करताय? UPI युजर्सना मोठा दिलासा, आता ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी ‘नो टेन्शन’ कारण…
UPI आल्यापासून, खिशात पाकीट घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे, कारण बहुतेक व्यवहार आता UPI द्वारे होत आहेत. आता या डिजिटल पेमेंट सुविधेत आणखी सुधारणा करण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
तुम्ही UPI युजर्स आहात? तुम्ही ऑनलाईन पेमेंट करतात? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI आपल्या आर्थिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. UPI आल्यापासून, खिशात पाकीट घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे, कारण बहुतेक व्यवहार आता UPI द्वारे होत आहेत. आता या डिजिटल पेमेंट सुविधेत आणखी सुधारणा करण्यासाठी, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आजकाल छप्पल शिवणाऱ्यापासून ते मॉलमध्येही ऑनलाईन पेमेंट बरेच जण करताना दिसतात. बऱ्याचदा काही तांत्रिक बाबींमुळे ऑनलाईन पेमेंट होत नाही… किंवा ट्रान्झॅक्शन फेल होतं तरी देखील अकाऊंटमधून पैसे कट झाल्याचे आपल्याला दिसते. मात्र आता Online पेमेंट करताना एखाद्या व्यवहारादरम्यान ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी देखील टेन्शन घ्यायचे काही कारण नाही.. कारण आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फेल झालं तरी ते पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. देशभरात नुकतीच UPI साठी ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे ऑनलाईन पेमेंट्स करणाऱ्या अॅप युजर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. चार्जबॅकची प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?

देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र

'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
