Chhagan Bhujbal On Petrol Shotage | महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त….छगन भुजबळांचा मोठा खुलासा
राज्यात इंधन साठ्याबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पेट्रोल आणि डिझेल साठ्याबाबत मोठा खुलासा केला आहे. सध्या देशाकडे केवळ एक महिना पुरेल इतकाच पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या संघर्ष आणि राजकीय घडामोडींमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचे पडसाद आता भारतातही उमटू लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भुजबळ म्हणाले की, इराण, अमेरिका आणि इतर देशांमधील तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम युरोप, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांवरही झाला असून इंधन दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती अद्याप नियंत्रणात असल्याचा दिलासाही त्यांनी दिला.
दरम्यान, राज्यात केरोसीनचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी त्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ही व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून केरोसीन वितरणासाठी विनामूल्य परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच ज्या भागात PNG गॅस पाइपलाइनचं काम पूर्ण झालं आहे, त्या भागातील नागरिकांनी 30 जूनपूर्वी जोडणीसाठी अर्ज करणं आवश्यक असल्याचा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.
Published on: May 20, 2026 01:57 PM
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,