Chandrakant Khaire | बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली तेव्हाच औरंगाबादच नाव बदललंय – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद शहराचं नाव आधीच बदललं आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी नाव बदललं, आता फक्त सोपस्कार बाकी राहिला आहे. इम्तियाज जलील काहीही बोलतो, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवावं, आम्ही या शहराचं नाव बदलणारच, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. 

औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धरण केला आहे. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI