उड्डानपुलाच्या उद्धाटनाला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी : रवी राजा

राज्य शासनाने कायद्याद्वारे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे. तरी मनपा  प्रशासनाकडून हा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केली.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला पालिकेच्या विरोधीपक्ष नेत्यांना निमंत्रण नाही. यामुळे काँग्रेसची पालिका प्रशासन आणि सेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेमध्ये जे कार्यक्रम होतात त्याचे निमंत्रण नगरसेवक व गटनेते यांना देणे अपेक्षित होते परंतु कार्यक्रमाची माहिती आणि निमंत्रण पत्रिका विरोधी पक्षानेत्याला देण्यात आली नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे. तसेच राज्य शासनाने कायद्याद्वारे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेत्याला वैधानिक दर्जा दिलेला आहे. तरी मनपा  प्रशासनाकडून हा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी व्यक्त केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI