केंद्र सरकारकने पेट्रोल डिझेल दरात कपात केल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोलच्या दरावर 9 रुपयांनी तर डिझेलच्या दरावर 7 रुपयांनी कपात केली आहे मात्र राज्य सरकारकडून पन्नास टक्के कपातीची अपेक्षा होती, त्यामुळे प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारकडून अत्यंत कमी सवलत दिली गेली असल्याचे सांगत त्यांनी केंद्राच्या सवलतीवर 50 टक्के सूट दिली असती तर लोकांना दिलासा मिळाला असता असेही त्यांनी सांगितले.