मणिपूर प्रकरणावरून संसद परिसरात ‘ब्लॅक डे प्रोटेस्ट’, विरोधकांकडून मोदी सरकारचा निषेध
मणिपूरच्या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटत आहेत. मणिपूर हिंसाचारावरून विरोधक संसदेत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाचे खासदार आज काळे कपडे घालून संसदेत पोहोचले आहेत.
नवी दिल्ली, 27 जुलै 2023 | मणिपूरच्या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटत आहेत. मणिपूर हिंसाचारावरून विरोधक संसदेत चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. या घटनेचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षाचे खासदार आज काळे कपडे घालून संसदेत पोहोचले आहेत. बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावरुन लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन केले नाही. त्यामुळे बुधवारी काँग्रेसने बुधवारी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. लोकसभेच्या सभापतींनी या प्रस्तावाला चर्चेसाठी मंजुरीही दिली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या प्रस्तावावर चर्चेसाठी तारीख ठरवणार आहेत.
Published on: Jul 27, 2023 1:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
