MPSC | MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, दीड वर्षांनी नियुक्तीचा आदेश काढला – Tv9

2019 मध्ये MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या बॅचमध्ये उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तसेच येत्या वर्षात 17 जानेवारीपासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 24, 2021 | 7:15 PM

मुंबईः 2019 मध्ये MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या बॅचमध्ये उत्तीर्ण 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तसेच येत्या वर्षात 17 जानेवारीपासून या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे 2022 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खरोखरच आनंदवार्ता घेऊन आले आहे, असेच म्हणावे लागेल.

विद्यार्थ्यांच्या आक्रमक भूमिकेला यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाल्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. 28 सप्टेंबर 2021 रोजी या 2019 मधील परीक्षेचा सुधारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा 413 पदांचा समावेश आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें