Osmanabad | एकाचवेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेत स्मशानभूमी गहिवरली

Osmanabad | एकाचवेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार, उस्मानाबादेत स्मशानभूमी गहिवरली

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:21 PM, 16 Apr 2021

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचीसुद्धा संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. रोज शेकडो रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत. स्मशानभूमीसुद्धा अपुरी पडू लागली आहे. उस्मनाबादमध्ये तर एका स्मशानभूमीत एकाच वेळी तब्बल 23 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. पाहा हेलावून टाकणारी दृश्यं.