AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं काय म्हणाले?

FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्… एमआयएम नेते ओवेसी नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 09, 2026 | 3:32 PM
Share

एमआयएमचे नेते Asaduddin Owaisi यांनी निदा प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितले की, FIR दाखल होण्यापूर्वीच निदाचं ट्रान्सफर झालं होतं, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशय निर्माण होत आहे. त्यानंतर त्यांनी अनेक आमदार खासदारांवर गुन्हे आहेत मग मतीन पटेलवरच प्रश्न का? असा सवालही त्यांनी केला.

ओवेसी म्हणाले की, कोर्ट अन्याय करणार नाही, आम्हाला कोर्टावर विश्वास आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निदा खानचा या प्रकरणाशी संबंध नाही, कारण एफआयआर होण्याआधीच तिची बदली झाली होती. त्यानंतर तिचा त्या शाखेशी संबंधच आला नाही. त्याशिवाय ती HR नव्हती. प्रकरणाला काही लोक राजकीय वळण देत आहेत.

पुढे एमआयएम नेते ओवेसी म्हणाले, बुरखा, नकाब, धार्मिक पुस्तकं पुरावा म्हणून वापरून तुम्ही गुन्हा सिद्ध नाही करू शकत. आता या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 09, 2026 03:32 PM
Follow Us