पद्म पुरस्कारांची घोषणा, सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मरणोत्तर पद्म विभूषण, तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Jan 25, 2022 | 10:12 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला (Cyrus Poonawala), बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींचा सन्मान करण्यात आला आहे. त्याचबरोबर सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनाही पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें