Pakistani Citizens Deported : नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही; व्हिसा रद्द केल्याच्या निर्णयावर नाराजी
India cancels Pakistani visas : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले असून पाकिस्तानी नागरिकांना परत मायदेशी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. या घटनेनंतर पाकिस्तानच्या विरोधात देशभरातून एकच संतापाची लाट उसळली आहे. तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कडक निर्णय घेतले. यात सिंधु जल करार स्थगिती बरोबरच पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतातून पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या नागरिकांना पाकिस्तानात जाण्याची इच्छा नसल्याच बघायला मिळत आहे. या निर्णयावर पाकिस्तानी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पोलिसांकडून याबाबत अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

