Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
First Photo of Militant Revealed : पहलगाम येथे फिरायला गेलेल्या पर्यटकांवर काल दहशतवाद्यांनी हल्ला केला. पुलवामानंतरचा सर्वात मोठा हा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यातल्या दहशतवाद्याचा एक फोटो आता पुढे आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. काल दुपारी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक पर्यटक आणि स्थानिक देखील जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये राज्यातील 6 पर्यटकांचा समावेश आहे. यात पुण्याचे 2, डोंबिवलीतील 3 तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे.
या हल्ल्याच्यावेळी काही दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरे देखील लावले होते अशी माहिती समोर आली आहे. आता यातील एका दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर आला आहे. 4 दहशतवाद्यांपैकी 2 काश्मीरचे तर 2 पाकिस्तानातले होते. आता यातील एका दहशतवाद्याचा पहिला हातात बंदूक घेतलेला फोटो समोर आला आहे.
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी

