India Pakistan Conflict : भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारत हल्ला करेल या भीतीने गायब झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पुन्हा अवतरले असून त्यांनी आता पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
भारत हल्ला करेल या भीतीने गायब झालेले पाकिस्तानचे लष्कर प्रमुख पुन्हा अवतरले आहेत. काल झेलममधल्या टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिराला लष्कर प्रमुख असीम मुनिर यांनी हजेरी लावली. तसंच भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित आणि जोरदार उत्तर दिलं जाईल, अशा वल्गना देखील मुनिर यांनी केल्या. पाकिस्तान मिलिटरीच्या या युद्ध सरावात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. सीमेवर देखील दोन्ही देशात तणाव वाढला असल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच भंबेरी उडलेली आहे.
Published on: May 02, 2025 04:47 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

