AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asim Munir : तर आम्ही अर्धे जग सोबत घेऊन जाऊ, पाकच्या लष्करप्रमुखाकडून अणुहल्ल्याची धमकी अन्...

Asim Munir : तर आम्ही अर्धे जग सोबत घेऊन जाऊ, पाकच्या लष्करप्रमुखाकडून अणुहल्ल्याची धमकी अन्…

| Updated on: Aug 11, 2025 | 11:58 AM
Share

अमेरिकेच्या दौऱ्यात मुनीरने सिंधू नदीवरील भारताच्या नियंत्रणावरून भारतावर हल्ला चढवला. आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू, असं मुनीर म्हणाला.

पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर याने अमेरिकेच्या भूमीवरून भारताविरुद्ध अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. जर इस्लामाबादला भारताकडून अस्तित्वाचा धोका जाणवला आणि आम्ही बुडत राहिलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाऊ, असं पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरने म्हटलंय. इतकंच नाहीतर पाकिस्तानकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, असा इशाराही पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरने दिला. अमेरिकेच्या टाम्पामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरने हे वक्तव्य केलंय.

दरम्यान, एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेच्या भूमीवरून तिसऱ्या देशाविरुद्ध अणुहल्ल्याची धमकी देण्याची ही पहिलीच घटना आहे. टाम्पा येथे व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये हजर असताना मुनीरने सांगितले की, “आपण अणुसज्ज राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटत असेल की आपण बुडत आहोत, तर आपण आपल्यासह अर्धे जग सोबत घेऊन जाऊ”

Published on: Aug 11, 2025 11:56 AM