Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा दानिश मास्टरमाईंड? भारताकडून त्याला देश सोडण्याचे आदेश
दानिश दिल्लीमधील पाकिस्तानच्या दूतावासामधील कर्मचारी आहे. संशयास्पद कृत्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलेलं आहे. भारत पाक संघर्षाच्या वेळीही ज्योती दानिशच्या संपर्कात होती. ज्योतीच्या पाक दौर्याचा खर्च सुद्धा दानिशने केला अशी माहिती समोर येतेय.
हरियाणाची असलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला भारतात हेरगिरी करून पाकिस्तानला गुप्त आणि संवेदनशील माहिती पाठवल्यच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ज्योती मल्होत्राच्या मागे पाकिस्तानचा दानिश मास्टरमाईंड असल्याची चर्चा आहे. दानिशच्याच मदतीने ज्योती मल्होत्राने पाकिस्तानची वारी केल्याची मोठी माहितीही समोर आलीये. दानिश दिल्लीतील पाकिस्तानच्या दूतावासामधील कर्मचारी असून तो भारतातील अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या संपर्कात होता. ज्योतीच्या पाक दौर्याचा संपूर्ण खर्च दानिशनेच केला होता. भारत पाकिस्तान संघर्षाच्या वेळीही ज्योती दानिशच्या संपर्कात होती. भारतात राहून दानिश संशयास्पद कृत्य करत असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं. दानिश त्याच्या अधिकृत पदाशी सुसंगत नसलेल्या कृतीत सहभागी असल्याचा भारताने ठपका ठेवलाय. दानिशने 24 तासांमध्ये देश सोडावा असा आदेश 13 मे रोजी भारत सरकारने काढला. भारत सरकारच्या आदेशानंतर दानिश देश सोडून पाकिस्तानात निघून गेला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ज्योतीची चौकशी सुरू झाली आहे. तर आता अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
यूट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शनही तपासामध्ये आता समोर आलंय. पाकिस्ताननंतर ज्योती मल्होत्रा चीनमध्ये गेली होती. चीनी अधिकाऱ्यांसोबत भेट घेतल्यानंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. ज्योतीला चीनमध्ये मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट आणि पोलीस सुरक्षा पाक दौऱ्यानंतर ज्योती मल्होत्रा चीनमध्ये गेली असल्याची माहिती मिळतेय.