India-Pakistan Conflict : बेअक्कल पाककडून नक्कल, शाहबाज शरीफकडून मोदींची कॉपी अन् भारतानंतर पाकचंही डेलिगेशन
भारतानंतर आता पाकिस्तान देखील परदेशात आपलं शिष्टमंडळ पाठवणार आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्ताने आता भारताचीच नक्कल केली आहे. पाकचा मंत्री बिलावल भुट्टो याच्या नेतृत्वात पाक त्यांचं शिष्टमंडळ परदेशात पाठवणार आहे.
पाकिस्तानने भारताची नक्कल करण्याचा सपाटा लावला आहे. पाकविरोधातील संघर्षानंतर भारताने जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक मंचावर भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारने शिष्टमंडळ तयार केलंय. याचीच कॉपी आता पाकिस्तानकडून करण्यात आल्याचे दिसून आलंय. पाकिस्तानने बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करून बिलावल भुट्टो याच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय. यामध्ये खुर्रम दस्तगीर खान, हिना रब्बानी कार, जलील अब्बास जिलानी शिष्टमंडळात असणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि जवानांशी संवाद साधला होता. त्यानंतर पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफने सियालकोटच्या एअरबेसला भेट देत मोदींसारखाच संवाद तेथील जवानांशी साधला. बघा व्हिडीओ