Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान गायब, भारत-पाक तणावादरम्यान ठोकली धूम; पत्रकाराचा एकच सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर तर बघा….
मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सोमवारी सांगितले की शरीफ येत नाहीत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धासारखी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शरीफ यांनी त्यांचा परदेश दौरा पुढे ढकलला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ गायब झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान शहबाज शरीफ गायब झाले का? असा सवाल पाकिस्तानी नागरिकच उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ कुठे आहेत? शहबाज शरीफ कुठेच दिसत नाहीत? असा सवाल थेट पाकच्या पत्रकारांनी देखील केला. यावर पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ हे सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत, असं उत्तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इश्याक दार यांनी पत्रकाराला उत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांचा मलेशियाचा अधिकृत दौरा रद्द केला आहे. शरीफ शुक्रवारी मलेशियाला जाणार होते पण त्यांनी रविवारी ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

