Pakistani Hindu Issue : पाकिस्तानी हिंदूंचा परत जाण्यास नकार; गुजरातमध्ये 50 कुटुंब करताय 2018 पासून वास्तव्य
Pakistani Hindus in Gujarat : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परत पाठवले जात आहे. मात्र पाकिस्तानी हिंदूंनी जाण्यास नकार दिला आहे.
गुजरातमधील मेहसानामध्ये 50 पेक्षा अधिक पाकिस्तानी हिंदू कुटुंब स्थायिक झालेले आहेत. आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत आता पाकिस्तानात परत जायचं नाही आहे. ही सगळी कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यापासून म्हणजेच 1947 पासून 2018 पर्यंत पाकिस्तानात राहिलेली आहेत. ही कुटुंबं एलटीव्हीवर भारतात आलेली आहेत. पाकिस्तानात हिंदू कुटुंबांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमची विनंती आहे की आम्हाला परत पाठवू नका, आम्हाला मरण मान्य आहे. आम्हाला गोळ्या घाला पण परत पाठवू नका असं यावेळी बोलताना या कुटुंबांनी म्हंटलं आहे. पाकिस्तानात आमच्यावर हिंदू असल्याने खूप अत्याचार झाले. आमचं आयुष्य असंच गेलं. पण आमच्या मुलांना भारतात भविष्य मिळेल, अशी भावना या पाकिस्तानी हिंदुंनी व्यक्त केली आहे.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?

