शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाला महिलेचा चोप

विरार पूर्वेतील साईनाथ नगर (Sainath Nagar, Virar East) इथं असलेल्या शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं चपलेनं चांगलंच हाणलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 29, 2022 | 12:54 PM

विरार पूर्वेतील साईनाथ नगर (Sainath Nagar, Virar East) इथं असलेल्या शिवसेना विभाग प्रमुखाला एका महिलेनं चपलेनं चांगलंच हाणलंय. जितू खाडे असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चपलेनं चोपलं आहे. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याच कारणानं संतप्त महिलेनं जितू खाडे (Jitu Khade) याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनंच चोप दिलाय. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेनं चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जातोय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें