चंदीगड : संपत्ती आणि पैशाच्या लालसेपोटी हरियाणामधील (Haryana) फरीदाबादमध्ये एक धक्कादयक अशी घटना घडली आहे. येथे संपत्तीसाठी सुनेने आपल्याच सासऱ्या चक्क खून (Murder)केला आहे. आपल्या प्रियकराच्या माध्यमातून या महिलेने सासऱ्याला गोळ्या घालून संपवलं आहे. खून करण्यासाठी महिलेनेच प्रियकराला पैसे दिल्याचे तपासात समोर आले आहे. मागील आठवड्याभरापूर्वी वल्लभगड येथेली न्यू फ्रेंड्स कॉलिनी येथे हे हत्याकांड घडले होते. त्यानंतर पोलिसांनी (Police)आठवड्याभरात या खूनचा उलगडा केला आहे. सुनेनेच ही हत्या घडवून आणल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेचे नाव गीता तर खून झालेल्या माणसाचे नाव भगतसिंह असे आहे. पोलिसांनी या खून प्रकणात आरोपी महिला गीता हिला बेड्या ठोकल्या असून तिचा प्रियकर कालिया फरार आहे.