विठुरायाकडून धनवर्षाव… अख्ख्या गावाची सफाई करणाऱ्या महिलेला लॉटरी अन् रातोरात मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्…
स्वच्छतेची कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. या समाजातील महिला व पुरुष पंढरपूर शहरात स्वच्छतेची काम करतात. येथील मनीषा वाघेला यादेखील शहरातील अनेक लोकांकडे शौचालयांच्या स्वच्छतेच काम करून आपला उदरनिर्वाह करतात.
पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला पांडुरंग पावला असं म्हटलं तरी अतिश्योक्ती ठरणार नाही. कारण एका साध्या महिला सफाई कर्मचाऱ्याला तब्बल 21 लाखांची लॉटरी लागली आहे. पिढ्यानपिढ्या स्वच्छतेचं काम करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला तब्बल 21 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही लॉटरी लागल्या नंतर साक्षात विठुरायाच पावला अशी भावना मनिषा वाघेला या लॉटरी विजेत्या महिलेने व्यक्त केली आहे. मनीषा वाघेला यांचे पंढरपुरात मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचे पत्र्याचे घर आहे. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेची काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अलीकडेच त्या पंढरपुरातील चौफाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी सहज शेजारीच असलेल्या लॉटरी केंद्रातून पन्नास रुपयांना 21 लाख रुपये किंमतीचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यामध्ये ध्यानीमनी नसताना त्यांना 21 लाख रुपयांची लॉटरी लागली. लाॅटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करणार आणि मुलांना चांगले शिक्षण देणार असा निर्धार मनीषा वाघेला यांनी व्यक्त केला आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

