AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?

Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?

| Updated on: Jul 16, 2026 | 1:17 PM
Share

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाच, मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंदिरातील समन्वयाच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाने सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला दर्शनाची परवानगी दिली. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना व्हीआयपी दर्शनाची परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याउलट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या सर्वांना दर्शनाची परवानगी देण्यात आल्याने दुजाभाव झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंदिर प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. नियम सर्वांसाठी समान असावेत आणि अशा प्रकारच्या गोंधळामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

दुसरीकडे, मंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, रांगेत उभे राहण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र, मंत्री म्हणून विविध शासकीय जबाबदाऱ्या असल्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे असते. माझ्यासोबत आलेल्या सर्वांना दर्शनाची परवानगी देण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे प्रशासनाने जाहीर केले असतानाही पहिल्याच दिवशी आजी-माजी मंत्र्यांच्या दर्शनाबाबत वेगवेगळा निकष लावल्याची चर्चा रंगली असून, मंदिर प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 16, 2026 01:17 PM

Follow Us