Pandharpur Token System : तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी टोकन, असं करा Online बुकींग
तिरुपती बाजाली मंदिरात भाविकांना दर्शनासाठी टोकन दिले जातात. त्याच पद्धतीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात येणार आहे.
आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराप्रमाणे दर्शन टोकन प्रणालीचा वापर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या टोकन दर्शन प्रणालीची चाचणी आजपासून सुरु झाली आहे. या टोकन दर्शन प्रणालीचे संगणकीय काम टीसीएस ही कंपनी करणार आहे. टोकन दर्शनाच्या माध्यमातून दिवसभरातून बाराशे भाविकांची दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन मंडपात दुसऱ्या मजल्यावर ज्या ठिकाणी बैठक व्यवस्था भाविकांसाठी करण्यात येणार आहे. भाविकांना घरी बसून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून दर्शनाचा स्लॉट बुक करता येणार आहे. पंढरपुरातील 9 ते 10 या वेळेत पहिल्या स्लॉटमधील 200 भाविकांना टोकन दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. दिवसभरातून टोकन दर्शनाचे सहा स्लॉट करण्यात आलेले आहेत. आषाढी यात्रेत गर्दीचे महत्त्वाचे तीन दिवस वगळून इतर वेळेला भाविकांना या टोकन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. भाविकांना टोकन दर्शन प्रणालीसाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरुन बुकींग करावे लागणार आहे.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

