Wari 2025 : हे माऊलींचे सेवेकरी की मारेकरी? देहूत फडणवीसांच्या अंगरक्षकालाच मारहाण अन्…भाविकांमध्ये संताप, बघा VIDEO
हजारो वर्षांची वारकरी परंपरा वाद आणि मुजोरीपासून कोसो लांब आहे. मात्र आज ज्या दोन घटना घडल्या त्यांनी नवा वाद उभा राहिलाय. नेमकं काय घडलंय?
सेवेकरांच्या वेशात फिरणारे हे देवाचे मालक बनले आहे. कुणी पोलिस आणि माध्यमांवर दमदाटी करताय तर कुणी कर्तव्य बजावणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षारक्षकांना मारतोय. हे दोघही कुणी ऐरेगैरे नाहीत एक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे आणि दुसरे आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजननाथ योगी.. एकाच्या नावात भावार्थ आणि दुसऱ्याच्या नावात योगी आहे. मात्र नावाचा आब राखला जाईल असा एकही गुण या दोघांकडे कणभरही नाही.
माऊली आणि वारी जणू काही आपल्या घरातील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याचा आवा या दोघांच्या वर्तणुकीत होता. देहूतील प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री दर्शनानंतर बाहेर पडत होते त्याच वेळी ड्युटी आणि प्रोटोकॉल प्रमाणे सुरक्षारक्षक फडणवीसांसोबत होते तितक्यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे स्वतः गर्दी करत पुढे आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाच्या पाठीवर मारून त्याला बाजूला केलं. रागाने त्याच्याकडे पाहत काही बडबड ही केली. जर देवाच्या दारात मुख्यमंत्र्यांच्याच सुरक्षारक्षकाची ही स्थिती असेल तर सामान्य वारकऱ्यांचं काय असा? प्रश्न या वागाणुकीने विचारला जातोय