Alandi : देहूत फडणवीसांच्या अंगरक्षकालाच मारहाण…माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी, बघा VIDEO
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण करताना दिसतायेत. तर तिकडे आळंदी देवस्थानचे विश्वस्त सुद्धा माध्यम प्रतिनीधी आणि पोलिसांवर अरेरावी करताना दुसऱ्या व्हिडीओत पाहायला मिळताय.
देहूमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगरक्षकांना संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनी मारहाण केली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेऊन बाहेर जात असतानाच ही सगळी घटना घडली आहे. प्रचंड गर्दीत फडणवीसांचे अंगरक्षक त्यांच्या मागे चालत होते आणि याच वेळी भावार्थ देखणे या फडणवीसांच्या अंगरक्षकांनाच मारहाण करण्यात आली.
दुसरीकडे आळंदी संस्थानचे विश्वस्त योगेश्री निरंजननाथ यांनी सुद्धा पुण्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसोबत अरेरावी केली आहे. पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पालखी मुक्कामी असतानाच निरंजननाथ यांनी माध्यप्रतिनिधींना अडवण्याचा प्रयत्न करत थयथयाट केला. देवाचे सेवेकरी देवाचे मालक झाल्यासारखे वागत असल्यामुळे आता सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

